सर्वमंगलमांगल्‍ये शि‍वे सर्वार्थसाधके शरण्‍ये त्र्यंबके गौरि‍ नारायणि‍ नमोस्‍तुते.
 
 
प‍ान क्र . 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19
   
माय तात अंबिका । बहिण भाऊ अंबिका
माय तात अंबिका । बहिण भाऊ अंबिका
गणगोत माझे तूची । तूची माय अंबिका
मागे पुढे सर्व स्‍थळी । असे नि‍त्‍य शैलबाकी
रक्षणारी सर्व काळी । तूंच तूंच गे अंबिका
मनी चिंतनी स्‍मरणी । तूंच नित्‍य गे भवानी
राहोनिया माझे दे‍ही । तूंच मजसि चालविसी
क्षणभंगुर हे जीणे । सार्थ जरी तुजसी करणे
नित्‍य नित्‍य जप तूं मनी । जगदंब जगदंबा
तीर्थ मोक्ष पुण्‍य सारे । जगदंब चरणां‍तरि ते
स्‍मरण निरंतरी कर तूं । जगदंब जगदंबा
 
खरे तर! मी पोपट तव बंदि
खरे तर! मी पोपट तव बंदि
मज मुळे मुजसी होत उपाधी
देशिल ते आनंदे खातो
शिकवतोस ते नीट बोलतो
 
पिज-यांत मी अविरत फिरतो असतो मी स्‍वच्‍छंदी
 
चाहुल तव मी सदैव घेतो
तूं दिसता मी हरखुनी जातो
शीळ मारुनि लक्ष वेधतो
तू मज जवळी नित्‍य रहाता मी होतो आनंदी
 
घेशील ते तूं नावच माझे
शिकवतोस तूं मन बहु वि‍हु विध‍जे
मला न कळते तुझे बोलणे
तुला रिझविता नाना परीने आनंदी हा बंदी
 
कधी कधी मज येईल त्रागा
तुला चावतो लटक्‍या रागा
मनात तुजवरि परी अनुरागा
आंजारूनि तूं जवळि घेता मज सम मी आनंदी
 
तूं मजवरती प्रेमच करिसी
मला दिल्‍याविन तूं नच खाशी
सदोदित मम कौतुक करीसी
कसे होऊ मी उतराई तव बंदिवास नच बाधी
 
तुमच्‍या सम आम्‍हास नच वाचा
प्रेमभाव तुजवरती साचा
जाणुनि घे तूं आशय मनिचा
पक्षी जन्‍म मम धन्‍य जाहला मिळता तुजसमसाथी
सौंदर्याची तूं रत्‍नाकरि तेज न मावे वदनि
सौंदर्याची तूं रत्‍नाकरि तेज न मावे वदनि
चंद्रर्कग्निहि जाति दिपोनि तुजपुढती जगजननी
कोटिकोटिरविशशि अग्निहुनि तेज तुझया गे नयनि
कृपाकटाक्षे जन्‍मां‍तरिचि दुरिते जाति विरोनी
 
सुवर्णरत्‍नांकित कमलासनि विश्‍वजननि बहु शोभे
नाना रत्‍ने मुकुटि हिरण्‍मय कुंडल कर्णि विलोभे
श्री विश्‍वेश्‍वर मन:प्रसादिनि शिवशक्‍ती तूं माया
प्रसाद भिक्षा दे मज ज्ञाना मोह जाउ दे विलया
 
हिमनगनंदिनि तूं दाक्षायणि विश्‍वेश्‍वरि तूं धात्रि
सौभाग्‍याचि माहेश्‍वरि तू कर्ति तशीच हर्ति
तूं दिपांकुरि विज्ञानाची मोक्षकरी तूं साची
ओमकाराची तूं बिजाक्षरि तूं अर्धांगि शिवाची
 
तूं करुणामयि कृपासागरि शंभुचित्‍त चकोरी
रिपुक्षयकरि गणेशजननी तूच उमा तूं गौरी
महाभयकरि सदाशिवकरि वससी मूलाधारी
कृपावलंबन करि अविलंबे काशिपुराधीश्‍वरी
 
मातान्‍न पूर्णेश्‍वरि अंबिके सदान्नपूर्णेश्‍वरि
वैराग्‍या‍सह ज्ञानाचि मज भिक्षा दे झडकरि
भवतापाने दग्‍ध शरण तुज कलत्र तनयास‍ह मी
पदपक्षार्पित चित्‍तवृत्त्‍ित मम सदा रमू दे नामी
 
सदानंद मेवा भक्तिचा नित्‍य नित्‍य मज घावा
जगदंबे तव सेवेस्‍तव मज पुर्नजन्‍महि मिळावा
उर्वरित मम काळ जगातिल जावो तव सेवेत
हेचि मागणे माय माउली! पुरव मनातिल हेत
 
करतिला मम कर तव सुटला मी पडलो आवर्ति
करतिला मम कर तव सुटला मी पडलो आवर्ति
अगणित झाले फेरे परि मज तुझी दिसेना मूर्ति
 
रंग रुप तव मुठि न आठवे कशि‍ होती आकृति
मंत्र विसरलो तंत्र न ठाउक कशी करावी स्‍तुती
 
आवा‍हन तव कसे करावे हाक कशी मारावी?
स्‍वर उमटेना, मम रुदने तव कानी कशी पोचावी
 
अंगि भरला आळस बहु मम पुजा कशी मग व्‍हावी?
मंत्र तंत्र शास्‍त्रोक्‍त पूजने होतुन कशी घडावी?
 
कसे कस तव यज्ञयाग मी धन जवळी ना पुरे
ब्राहमण भोजन कसे करवु मी त्राण न अंगि उरे
 
वय बहु गेले अबधि न उरळा कृपा कशिपण व्‍हावी?
जगदंबे मम चित्‍तवृत्ति तव पायि कशी जडवावी?
 
तूच आई गे कृपा करि मज जन्‍म देई गे पुन्‍हा
ज्‍यामध्‍ये तव छंद भक्तिचा जडेल माझ्या मना
 
उरला आहे जो काही मम आयुप्‍याला काळ
तुझ्यात नामस्‍मरणी जावा तु हो बंध तात्‍काळ
 
 
एका जनार्दनी (Ebook)
 
कोल्हापुर (महालक्ष्मी)
तूळजापुर (भवानीमाता)
माहूर (रेणुकामाता)
संर्पक
वि‍नय क्षीरसागर
अ – 901, सागरदि‍प सोसायटी,
केळकर महावि‍द्यालयासमोर, मुलुंड- (पूर्व).
मुंबई- 400081.
घरचा दुरध्‍वन‍ी क्रमांक : 25635378
 
  Copyright 2011 Devibhoyare. All Rights Reserved