सर्वमंगलमांगल्‍ये शि‍वे सर्वार्थसाधके शरण्‍ये त्र्यंबके गौरि‍ नारायणि‍ नमोस्‍तुते.
 
 
दैनंदिन पूजा-अर्चा आणि‍ मंदीराचे व्यवस्थापनाचे स्वरूप
सुमारे 200 वर्षापूर्वी माहूरची श्री रेणुकामाता देवीभोयरे या स्थानी तांदुळाकार मूर्तिच्या स्वरूपात स्वयंभू प्रगट कशी झाली याची कथा आपल्या वाचनात आली आहेच. याठिकाणी वेदि‍का रचून त्यावर मूर्ति‍ची प्रति‍ष्ठापना करण्यात आल्यानंतर गावक-यांच्या सहकार्याने छोटे देऊळ ही बांधण्यात आले. देवळाची रचना हेमाडपंथी प्रकारची होती.
गावामध्ये पुजारी वृत्तिच्या गुरवांची दोन कुटुंबे होती. त्यांचे आडनाव केदारी. त्यांच्याकडे श्रीअंबाबाईच्या दैनंदि‍न पूजेअर्चेची आणि‍ सकाळ संध्याकाळच्या आरतीची व्यवस्था वंशपरंपरागत हक्कांने सोपवि‍ण्यात आली. या दोन कुटुंबांकडे प्रत्येंकी एक वर्षे या प्रमाणे आलटून पालटून पुजेचे अधि‍कार असून दरवर्षी अक्षय्यतृतीयेला त्यांचे साल बदलते.
मंदीराच्या व्यवस्थेसाठी प्रथमतः सन 1952 मध्ये खाजगी वि‍श्वस्त न्‍यास 'ट्रस्‍ट' म्हणून नोदंवि‍ण्यात आला. त्यावेळी दोन्ही केदारी कुटुंबाचे प्रमुख हेच वि‍श्वस्त म्हणून काम पहात होते. त्या‍नंतर या जागृत देवस्थानाचा महि‍मा वाढू लागला आणि‍ देवीदर्शनासाठी भक्तांची गर्दीही वाढू लागली. वि‍शेषतः येथील वैशि‍ष्टायपूर्ण नवरात्रोत्सवामध्ये आजूबाजूच्या गावातून आणि‍ परगावाहूनही मोठया संख्येने भक्तगण येऊ लागले.
त्‍यामुळे सन 1974 मध्‍ये हा खाजगी वि‍श्वस्‍तन्‍यास- ट्रस्‍ट श्री देवीअंबि‍का ट्रस्‍ट , देवीभोयरे ता. पारनेर, जि‍. अहमदनगर या नावाने सार्वजनि‍क वि‍श्वस्‍तन्‍यास सार्वजनि‍क ट्रस्‍ट म्‍हणून कायदेशीर रीत्‍या नोदंवि‍ण्‍यात आला. त्‍याचा नोदंणी क्र.पी.टी.ए-63 एन असा आहे. यामध्‍ये सात जणांचे जे वि‍श्वस्‍त मंडळ नेमण्‍यात आले त्‍यामध्‍ये वंशपरंपरागत पुजारी केदारी गुरव यांच्‍या दोन्‍ही कुटुंबांचे चार प्रति‍नि‍धी वि‍श्वस्‍त असून तेच मंदीराच्‍या व्‍यवस्‍थापनाची जबाबदारी नि‍ष्‍ठेने सांभाळतात. अन्‍य तीन वि‍श्वस्‍त हे गावातील प्रति‍ष्‍ठि‍त कुटुंबातील सर्वसंमत मान्‍यवर व्‍यक्‍ति‍ आहेत. अष्‍टभुजा देवीच्‍या पि‍तळीकवच मूर्ति‍चे संस्‍थापक कै. शंकर देवराव क्षीरसागर उर्फ रावसाहेब मामलेदार यांचे वारस प्रति‍नि‍धी म्‍हणून त्‍यांचे कनि‍ष्‍ठ सुपुत्र श्री.वि‍नायक शंकर क्षीरसागर हे एक वि‍श्वस्‍त असून वि‍श्वस्‍त मंडळाचे ते मानद अध्‍यक्ष आहेत. त्‍याचप्रमाणे श्री. लक्ष्‍मण हि‍रूजी गाजरे ( नि‍वृत्‍त बँक संचालक ) हे एक वि‍श्वस्‍त आहेत.
वि‍श्वस्त मंडळाच्या संमतीने ग्रामस्थ मंडळींनी ‘’श्रीदेवी अंबि‍का मंदीर जीर्णोध्दार समि‍ती’’ स्थापन करून गेल्या सुमारे 15 वर्षामध्ये लोकवर्गणी-देणग्‍या जमवून जीर्णोध्दा‍राचे काम पूर्ण केलेले असून पूर्वीच्या हेमाडपंथी मंदीराचा संपूर्ण कायापालट करून आता ते अधि‍क वि‍स्तृत व सुदंर बनवि‍ले आहे. देवळाचा कळसही 70 फूट उंच केला आहे. त्याचप्रमाणे परगावाहून येणा-या भक्त मंडळींसाठी नि‍वासी खोल्याही बांधल्यां आहेत.
मंदीराच्‍या वाढत्‍या लोकप्रि‍यतेमुळे वृध्‍दींगत होणा-या उत्‍पन्‍नाच्‍या अनुषंगाने मंदीराचा अधि‍क वि‍कास करून या जागृत देवस्‍थानाला अग्रगण्‍य देवस्‍थान बनवि‍ण्‍यासाठी वि‍श्वस्‍त मंडळ प्रयत्‍नशील असून समस्‍त गावक-यांच्‍या सहकार्याने ते त्‍यामध्‍ये यशस्‍वी होईल असा वि‍श्वास वाटतो.
 
कोल्हापुर (महालक्ष्मी)
तूळजापुर (भवानीमाता)
माहूर (रेणुकामाता)
 
 
  Copyright 2011 Devibhoyare. All Rights Reserved