सर्वमंगलमांगल्‍ये शि‍वे सर्वार्थसाधके शरण्‍ये त्र्यंबके गौरि‍ नारायणि‍ नमोस्‍तुते.
 
 
भौगोलिक माहिती श्रीक्षेत्र देवीभोयरे:
श्रीक्षेत्र देवीभोयरे श्री. अंबिकादेवी हे ठिकाण महाराष्ट्रात, अहरमदनगर जिल्‍‍हयात, पारनेर तालुक्यात आहे. पारनेर तालुक्याच्या पश्चिमेला पारनेर पासून 18 कि. मी. वर व शिरूर पासून 24 कि.मी. अंतरावर देवीभोयरे हे क्षेत्र आहे.
गावाचे क्षेत्रफळ 1845 हेक्टर आहे. जमीन प्रामुख्याने काळी व बागायती आहे. मुबलक पाणीपुरवठा, मुख्यतः नदी कुकडी कालवा व जलसिंचन सुविधा यामुळे इथे सर्वप्रकाराची पिके होतात. मराठा घराण्याचे सर्वात जास्त लोक इथे आढळतात. उदा. बेलोटे, मुळे, सरडे, जाधव, गाजरे, बारूडे, सरोदे, शितोळे वगैरे. बारा बलुतेदारांमधे गुरव, केदारी, माळी, मेहर, काळधुगे, भामरे, तेली घोडके वगैरेचा समावेश होतो. सर्व जातीचे लोक आपापला पारंपरिक व्यावसाय करतात. इथे चालणारे मुख्य व्यवसाय म्हंणजे सुतार, लोहार, कुंभार, न्हा‍वी, तेली, सोनार, चांभार इत्यादी आहेत.
पूर्वीच्या काळी क्षीरसागर घराण्याला विशेष मान होता. कारण एकतर ब्राम्ह‍ण घराणे व क्षीरसागरांच्या पूर्वजांना साक्षात्कार झाल्याने, मूळ संस्थापक असल्याने त्यांना पूजेच्या व गावातील एक प्रतिष्ठित व्याक्ति, घराण्याचा सन्मान असे. पण पुढे नोकरी, व्यवसायामुळे येणे जमत नसल्याने पूजा अर्चा करण्यासाठी, देवीचे सेवेकरी म्हणून गुरव परंपरागत होते. आजही त्यांची पिढीच मंदिरातील पूजाअर्चा सर्व सांभाळत आहे.
देवीभोयरे गावात ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, पतसंस्थात, विविध सेवा सोसायटी, आरोग्य केंद्रे, शाळा, दळणवळणाची सोय उदा. टेलिफोन बूथ, पोस्ट आफिस वगैरे सर्व सोयी उपलब्ध आहेत. तसेच साखर कारखाना, विद्यालय, सांस्कृतिक व नाटय मंडळे, पेट्रोलपंपही आहेत. जीवनावश्यक वस्तूं ची दुकाने, हाटेल, मेडिकल्स,, स्टेशनरी वगैरेंचीही आहेत. नळपाणीपूरवठा, वीज योजना, शास‍‍कीय कार्यालय व योजना, रस्ते जोडणी वगैरे सोयीही आहेत.
पुणे ते शिरूर, शिरुर ते कल्याण (मुंबई), नगर पारनेर देवीभोयरे इत्यादी ठिकाणी सर्व डांबरी रस्ता आहे. पुणे मुंबईतून शिरूर कडे जाणा-या अनेक एस. टी. बसेस आहेत. त्या सर्व देविभोयरे येथे थांबतात. तसेच अहमदनगर येथुनही सुपे मार्गे अनेक बसेस उपलब्ध आहेत.
 
 
 
कोल्हापुर (महालक्ष्मी)
तूळजापुर (भवानीमाता)
माहूर (रेणुकामाता)
 
 
  Copyright 2011 Devibhoyare. All Rights Reserved