सर्वमंगलमांगल्‍ये शि‍वे सर्वार्थसाधके शरण्‍ये त्र्यंबके गौरि‍ नारायणि‍ नमोस्‍तुते.
 
 
भाग 3 रा , नि‍वेदन
आहेच सांप्रत खरें जग हें अशाचे
श्‍लोक
ठेवी न जो विधिनीषेध विकल्‍प कांहीं
दावी जगास अवडंबर सर्व पाही।
वागे शुभाशुभ गणी न कधी कशाचे
आ‍‍हेच सांप्रत खरें जग हें अशाचे ।।१।।
 
विदया धनादिक जरी बहु अल्‍प होई
दावी जगास तरिं पंडितता बढाई
जो नित्‍य कीर्तन करी स्‍वमुखें यशाचे
आहेच सांप्रत खरें जग हें अशाचे ।।२।।
 
झाला खरोखर जरी अपमान थोर
दावी जगास निज गौरवसा समोर
शब्‍दावडंबर जगा भुलवी जयाचे
आहेच सांप्रत खरें जग हें तयाचे ।।३।।
 
शिष्‍टापरी मिरवणें जगि दर्पयुक्‍त
गोष्‍टी बडया इतर तुच्‍छ वदे असत्‍य
शब्‍दक्रिया मन विभिन्‍न सदा जयाचे
आहेच सांप्रत खरें जग हें तयाचे ।।४।।
 
जो वाढवी निजम‍हत्‍त्‍व मुखें स्‍वयेंच
लोकीं फुगे स्‍वकॄतिनेच वदे न साच।
मी मी करोनि मिरवी बळ जो यशाचे
आहेच सांप्रत खरें जग हें अशाचे ।।५।।
 
मानूनि अंध जनता मिरवी प्रकाश
ज्ञाता धनी विपुल‍कीर्ति असा जनास।
ना पापपुण्‍य भय लेश मनीं जयाचे
आहेच सांप्रत खरें जग हें तयाचे ।।६।।
 
ज्‍या ध्‍येय कीं स्‍वहीत हेंच न अन्‍य कांही
दावी परार्थपटुता परि सर्वदा ही ।
शब्‍द‍ि‍क्रया भुरळ घालि जना जयाचे
आहेच सांप्रत खरें जग हें तयाचे ।।७।।
 
मी कोण कोठिल शिवे न कधीं विचार
सर्व स्‍वतंत्र जगिं मीच न अन्‍य थोर ।
सत्‍ता वसे अशि अगाध मनीं जयाचे
आहेच सांप्रत खरें जग हें तयाचे ।।८।।
 
जातील दोन दिन हे चिरकाल नाहीं
आयुष्‍य हें घडि धडी खपते न राही ।
ऐसा विचार वरि चित्‍त न हें जयाचे
आहेच सांप्रत खरें जग हें तयाचे ।।९।।
 
ऐशा कृतार्थ पुरुषा दुरुनी नमावें
ज्‍याची स्‍वयंकृति अशीं जगतीं न मावे ।
आहेच सांप्रत जरी जग हें तयाचे
लाभो तयास पुरवो तरि हेत याचे ।।१०।।
 
माते तुझ्या चरणिं आश्रय देसि आम्‍हा
तेणेंच नित्‍य मनिं तुष्टि घडे प्रकामा ।
लागों तुझ्या भजानि ‍हें न साच नित्‍य
याहून अन्‍य जगदंब न मदीय ‍चित्‍त ।।११।।
 
चालो सदा जगिं अनन्वित कारभार
खोटें खरें अशुभ वा शुभ हा प्रकार ।
आम्‍हां त्‍वदीय पदपंकज हेंच सार
राहूं निरिच्‍छ बनुनी न दुजा विचार ।।१२।।
 
सर्वस्‍व तूं अमुचें जगदंब माते
आम्‍ही तुझे नित्‍य शिशूच दुजें न नातें ।
वाटो कसहि गुणहीन सदा जना मी
तू् माय एक करिशी मम चोज नामी ।।१३।।
 
उत्‍संगवर्ति शिशु मी तव विश्र्व माते
त्‍वप्रेम पूर्ण निरपेक्ष तुझया जनाते ।
निर्धार हा धरुनि वागतसे जनांत
जाणो कसा कुटिल हा व्‍यवहार येथ ।।१४।।
 
नारायणि त्रिपुरसुं‍दरि विश्रमात
र्बाले शिवे परशिवे अयि शंभुकांते ।
अंबे जगज्‍जननि मां परिपाहि नित्‍यं
इत्‍थं स्‍मरत्‍वनिशमेव मदीयचित्‍तं ।।१५।।
 
जावो क्षणक्षण तुझया स्‍मरणांत माझा
पाहूं तुझयाच पदिं चित्‍त समस्‍त काजा ।
कर्तव्‍य काय मज तें मग या जगाचें
राहों कसेंहि मग तें जग हें अशाचे ।।१६।।
-----------------------
ओम तत्‍सत
श्री जगदंबा प्रीयताम
 
एका जनार्दनी (Ebook)
 
कोल्हापुर (महालक्ष्मी)
तूळजापुर (भवानीमाता)
माहूर (रेणुकामाता)
संर्पक
वि‍नय क्षीरसागर
अ – 901, सागरदि‍प सोसायटी,
केळकर महावि‍द्यालयासमोर, मुलुंड- (पूर्व).
मुंबई- 400081.
घरचा दुरध्‍वन‍ी क्रमांक : 25635378
 
  Copyright 2011 Devibhoyare. All Rights Reserved