सर्वमंगलमांगल्‍ये शि‍वे सर्वार्थसाधके शरण्‍ये त्र्यंबके गौरि‍ नारायणि‍ नमोस्‍तुते.
 
 
प‍ान क्र . 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19
   
चाल-तुझे रूप चित्ती राहो
जडो छंद नामाचा तव
हृदयी वसो मूर्ती
दैनंदिन करु व्‍यवहारी
मिळो मन:शांती
 
तुझे नाम कलिमन दहना, हरति पापराशी
नित्‍य जपति जे त्‍यांची तूं काळजी वहासी
सर्व भोग ऐश्‍वर्याचे, तू तयास देसी
अंती तया पावन करूनी, निजपदासी नेसी
 
जगज्‍जननी स्‍मरति जे तुज, जगति तेचि धन्‍य
जीणे साथ होई त्‍यांचे, होती लोकमान्‍य
उणे काय ऐश्‍वर्याला? भाग्‍यवंत होती
तुझया कृपे आश्रय, इतरा निजपदासी देती
 
तुझी कृपा मी जगदंबे, सर्व अर्थ साधी
सर्व मगंला मांगल्‍ये, त्रयंबकाचे गौरी
महालक्ष्‍मी नारायणी तुज शरण, चरणवंदि
कृपा करुनि पावन ‍करि मज, ठाव दे पदासी
 
अंबिके! तुझया सेवेचा सदानंद मेवा
पुन्‍हा पुन्‍हा मिळण्‍यास्‍तव मन पुर्नजन्‍म यावा
नित्‍य तुला ध्‍यावे गावे, स्‍मरावे उदंड
तुझ्या पदि विरूनी जाता मिळो देहदंड
 
राग-चंद्रकंस ताल नाटकी त्रिताल चाल-हसले मनि चांदणे
कोण वाचविल दुजी तुझ्याविन
अंति ये धाऊनी । भवानी तुजवणि मज ना कुणी
धाव घे धाव कुलस्‍वामिनी ।। धृ ।।
 
माय बाप मज बंधु न सोडवी
पुत्र पुत्री कामिनी
गुंतून गेलो तुला विसरलो
मनी खंत ही सलते । भवानी ।। १ ।।
 
घालविले वय मौजेखातर
तन मन धन वेचले
धर्म कर्म यम नियमाचेही, बंधन नामानिले
स्‍वहित विसरलो गुरुजन दुखऊनी
अंति दया दाऊनी । भवानी ।। २ ।।
 
हीन पतित मी बहु अपराधी, दुराचारी दुर्मती
मी अधमाहुन दुष्‍ट अधम परि, शरण तुला शेवटी
करि मज पावन दीन दयाधन
अंती पस्‍ताउनी । भवानी ।। ३ ।।
 
न‍को अव्‍हेरूस मज जगदंबे माय कुलस्‍वामिनी
मी शरणागत तव पदि अवनत घे मज स्विकारूनी
कुपुत्र जरि मी, तू न कुमाता ख्‍याती तव त्रिभुवनी
भवानी । तुजविण मज ना कुणी ।।४।।
 
तुझ्या कृपेस्‍तव हृदय तळमळ मीन जळविण जसे
आर्त माझिया भाव मनातील समजावू तुज कसे
घे जाणुनी तू हे करूणामयी हृदयी मम प्रकटुनी
भवानी तुजविण मज ना कुणी ।।५।।
 
मला न ठाऊक मंत्र तंत्र अन स्‍तुति स्‍तवने तव पुजा
भाव भक्ति मम मानी ना उपजे मी नच सेवक तुझा
कशि घडावी कृपा भगवती? संभ्रम पडतो मनो
भवानी। तुजविण मज ना कुणी ।।६।।
चाल-त्या चित्तचोरटयाला का आपुले म्हणुं मी ?
जगदंब माऊलीला दिन रात्र आठवावे
ध्‍यावे सुखे पुजावे स्‍मरणात दंग व्‍‍हावे ।।धृ।।
 
श्री आदिशक्‍ती माया त‍ि‍ज आदि नाही अंत
नारायणी भवानी सुरश्रेष्‍ठ स्‍तविती संत
वागीश्वरी उमा तूं भवपार मज करावे
जगदंब माऊलीला ।।१।।
 
जगदंबिका भवानी त्रिगुणात्मिका स्‍वरूपिणी
सर्वेश्‍वरी सुखश्री आनंद ज्ञान रूपि‍णी
जगव्‍यापिनी मृडानी नामी सदा रमावे
जगदंब माऊलीला ।।२।।
 
तिज शरण मात्र होता करिते कृपा सदाची
धन पुत्र सौख्‍यशांती दे प्राप्‍ती निजपदाची
तूं स्‍वामिनी कुळाची, तव चरणी तीन व्‍हावे
जगदंब माउलीला ।।३।।
 
मम आत्‍मरूपाचे मला ज्ञान दे
मम आत्‍मरूपाचे मला ज्ञान दे
देहि वसे तव चितशक्‍ती जी ती मजसी पाहु दे
 
अज्ञानाचे पटल विरू दे ज्ञानोदय होऊ दे
त्‍या ज्ञानातुन तुझया रुपाचे दर्शन मज घडू दे
 
गर्व अहंता ममत्‍व सरू दे विनय नम्रता दे
संत समागन मनसि होऊ दे सन्‍मार्गी बुध्दि दे
 
सुख दु:खी म‍न अविचल असु दे शांति सौख्‍य मज दे
स्‍मरण तुझे मज निशिदिन घडु दे चिंतनी तव राहू दे
 
षड्ररिपु बाधा मज न होऊ दे सन्‍मार्गी बुध्दि दे
सतकर्मी रति शुध्‍द मनि दे भक्तिमार्गी गति दे
 
सर्व स्‍थळी तव रुप मनोहर जगदंबे पाहु दे
तव यश गाया अविरत गाता जीवन मम संपु दे
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
एका जनार्दनी (Ebook)
 
कोल्हापुर (महालक्ष्मी)
तूळजापुर (भवानीमाता)
माहूर (रेणुकामाता)
 
संर्पक
वि‍नय क्षीरसागर
अ – 901, सागरदि‍प सोसायटी,
केळकर महावि‍द्यालयासमोर, मुलुंड- (पूर्व).
मुंबई- 400081.
घरचा दुरध्‍वन‍ी क्रमांक : 25635378
 
  Copyright 2011 Devibhoyare. All Rights Reserved